रोहण बोपन्ना-अ‍ॅडम यांचे आव्हान संपुष्टात   

पॅरीस : फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उप उपांत्य फेरीच्या  सामन्यात भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहण बोपन्ना आणि त्याचा साथीदार अ‍ॅडम पॅल्वेसके यांच्या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. हॅरी हिलोवारा आणि हेन्री पॅटेन या जोडीने २-६ ६-७(५) असा भारतीय जोडीचा पराभव केला. 
 
प्रतिस्पर्धी जोडीने भारतीय जोडीला ५-१ अशा फरकाने मागे टाकले. त्यानंतर त्यांनी मोठी आघाडी घेतली.फिन याने मारलेले स्मॅश आणि जोरदार फटके भारतीय टेनिसपटूंना समजले नाहीत. तसेच काही फटके इतके जोरदार होते की त्यांना ते परतवून लावता आले नाहीत. आणि उप उपांत्य फेरीचा सामना जिंकला. या पराभवामुळे बोपन्ना आणि त्याचा साथीदार अ‍ॅडम यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. 

Related Articles